शासन निर्णय
आर्य वैश्य समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांकरीता शेतीपूरक व्यवसाय, विपणन, प्रक्रिया, उद्योग, पुरवठा आणि साठवणूक यांबरोबर लघू उद्योग, वाहतूक,अन्य व्यावसायिक उद्योग उपलब्ध करुन देणे किंवा त्यास अर्थसहाय्य करुन स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन आर्थिक स्तर उंचावणे, यासाठी कंपनी अधिनियम, 2013 च्या कलम 8 अंतर्गत श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.